Sunday, December 3, 2017

वायु प्रदूषण, असेही !!

भारत विरुद्ध श्रीलंका, तिसरी कसोटी, दिवस दुसरा, रविवार, ३ डिसेम्बर, २०१७

आजचा दिवस विराट कोहलीच्या द्विशतकाने गाजला असला तरी आज चर्चा झाली ती दिल्लीतील वायु प्रदूषणाची. एक दोन नव्हे तर वारंवार लंकेकडून श्वसनाचा त्रास कारण देऊन फिरोजशाह कोटला वर खेळ थांबवण्यात आला. बरेच जण याला रडिचा डाव म्हणतील, पण दिल्लीतील वायु प्रदूषणाचे वास्तव आज पुन्हा एकदा जगासमोर आले. खरंच आता काहीतरी ठोस उपाययोजना करायची वेळ आली आहे. परंतु दिल्लीमधील हिवाळयातील दर वर्षीची परिस्थिति पाहता BCCI ने या ठिकाणी सामना आयोजितच कसा केला, हा संशोधनाचा विषय आहे. 

Photos courtesy: YahooMonday, March 13, 2017

Connect The Dots - Rashmi Bansal

कनेक्ट द डॉट्स

आयुष्याचा एक आराखडा असतो हे सत्य आहे. एक विस्तृत आराखडा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट असो, तुम्हाला घडवित असतो. आजचे तुम्ही त्या अनुभवांचा परिपाक असता.  

एखादी अकल्पित भेट... 
ऐसपैस गप्पा...
मनात रुतून बसलेला एखादा लेख...
आयुष्याच्या प्रवासातील ही अनपेक्षित वळणं असतात. पण तीच तुम्हाला 'ध्येया'कड़े घेऊन जातात. 
तेव्हा मुक्त व्हा, बाहेर पडा, अधिकाधिक व विविध गोष्टी करीत रहा, अधिक शिका, अधिक अनुभव घ्या. आयुष्याच्या कॅनव्हासवर अनुभवांचे असंख्य बिंदू निर्माण करा. 

धीटपणाने, चमकदार शैलीत आयुष्याचं चित्र रंगवा... रंगांची निवड तुमची स्वतःची असू दया. एखाद्या कलाकृतीसारखे आयुष्यही निर्माण करा. 

ते सुंदर असू दया. त्यामध्ये आनंद उसळू दया. तुमच्या मनीचे गुज त्यातून प्रकट होऊ दया. 

--- रश्मी बंसल 
मुंबई, फेब्रुवारी २०१०  

वायु प्रदूषण, असेही !!

भारत विरुद्ध श्रीलंका, तिसरी कसोटी, दिवस दुसरा, रविवार, ३ डिसेम्बर, २०१७ आजचा दिवस विराट कोहलीच्या द्विशतकाने गाजला असला तरी आज चर्चा झ...