कनेक्ट द डॉट्स
आयुष्याचा एक आराखडा असतो हे सत्य आहे. एक विस्तृत आराखडा. आयुष्यातील प्रत्येक अनुभव, मग तो चांगला असो वा वाईट असो, तुम्हाला घडवित असतो. आजचे तुम्ही त्या अनुभवांचा परिपाक असता.
एखादी अकल्पित भेट...
ऐसपैस गप्पा...
मनात रुतून बसलेला एखादा लेख...
आयुष्याच्या प्रवासातील ही अनपेक्षित वळणं असतात. पण तीच तुम्हाला 'ध्येया'कड़े घेऊन जातात.
तेव्हा मुक्त व्हा, बाहेर पडा, अधिकाधिक व विविध गोष्टी करीत रहा, अधिक शिका, अधिक अनुभव घ्या. आयुष्याच्या कॅनव्हासवर अनुभवांचे असंख्य बिंदू निर्माण करा.
धीटपणाने, चमकदार शैलीत आयुष्याचं चित्र रंगवा... रंगांची निवड तुमची स्वतःची असू दया. एखाद्या कलाकृतीसारखे आयुष्यही निर्माण करा.
ते सुंदर असू दया. त्यामध्ये आनंद उसळू दया. तुमच्या मनीचे गुज त्यातून प्रकट होऊ दया.
--- रश्मी बंसल
मुंबई, फेब्रुवारी २०१०