रविवार, १० मार्च, २०१९

हरवलेला तळमजला!!!

आज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी  व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे.

हरवलेला  तळमजला!!!

श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळमजला.

हा पत्ता, सध्या नाहिसा होत चाललाय.
जुन्या इमारतीच्या जागी,
नवीन इमारती बांधल्या जाऊ लागल्यावर,
तळमजल्याची जागा, `कार-पार्किंग',
नं घेतलेय.

या तळमजल्याचं...,
लहानपणी वेगळचं स्थान होतं.

संध्याकाळी खेळायला खाली उतरल,
की मित्र-मैत्रिणींना हाका मारून,
ते खाली येई पर्यंत.....,
तळमजल्यावरच्या घरातले...,
काका, काकू, मावशी, आजी, आजोबा,
कुणीतरी बाहेर येऊन चौकशी करायचे,
"शाळा, अभ्यास", वगैरेची...
मैत्रिणीं खाली जमेपर्यंत.....,
त्यांच्याशी गप्पा व्हायच्या;
आमच्या खेळाला, सुरुवात व्हायची.

खेळताना तहान लागली.....
हक्कान पाणी मागायचो...,
'तळातल्या' घरात; तेही,
न कंटाळता द्यायचे आमच्या,
15-20जणांच्या gang ला!!!

कंटाळा आला की.....,
`बैडमिंटन'च्या `रैकेट्स'...,
खिडकीतून हाक मारून ठेवायला द्यायचो.
तेही ठेवून घ्यायचे.
कधी-कधी `रैकेट', त्यांच्यकडेच रहायच्या.
मग घ्यायच्या, दुसऱ्या दिवशी.

       कोणाला लागलं, खेळताना,
तरी तळमजल्यावरच्या घरात,
मलमपट्टी देखील व्हायची!!

एक ना अनेक, कितीतरी आठवणी.
मात्र, सगळं बदलत चाललाय.
तळमजला..., चाललाय!

बरोबर, माया-आपुलकी ही,
हरवू लागलेय.
`टॉवर' नामक बंदिस्त इमारतीत,
बंदिस्त आयुष्य झालंय.

तळमजला मात्र, हरवलाय !!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

हरवलेला तळमजला!!!

आज रविवार, १० मार्च २०१९. सकाळी सकाळी  व्हॉट्सऍपवर एक मस्त मेसेज आला. तो पोस्ट करत आहे. हरवलेला  तळमजला!!! श्री.अमुकमुक, अमुक बिल्डिंग, तळ...