आजपर्यंत राजगड बद्दल खूप ऐकलं होतं. गडांचा राजा, राजांचा गड हे तर आपण लहानपणापासूनच ऐकत आलोय. पण काल एक पुस्तक वाचतांना राजगड विषयी नवीनच माहिती मिळाली. पुस्तकाचे नाव हवाई मुलुखगिरी आणि लेखक मिलिंद गुणाजी. मिलिंद गुणाजींबद्दल काय बोलू.. त्यांचे प्रत्येक पुस्तक मी अनेकदा वाचलंय. हवाई मुलुखगिरी बद्दल बोलायचे तर यात मिलिंद यांची ओघवती भाषाशैली आहे आणि यातली छायाचित्र घेतली आहेत शिवसेना प्रमुख मा. उद्धवजी ठाकरे यांनी.
या पुस्तकाच्या वाचनाने या पुस्तकात समाविष्ट केलेल्या किल्ल्यांबद्दल नवीनच माहिती मिळाली. राजगड बद्दलही तेच झाले. या किल्ल्याच्या बालेकिल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बुरुजाखाली अफझलखानाचे शिर पुरले आहे, अशी व तत्सम माहिती राजगड किल्ल्याच्या सदरात वाचायला मिळाली. राजगड बद्दलचे पुस्तकातील सदर या लेखात जोडत आहे. जरूर वाचा.
(जर तुम्ही ट्रेकर असाल तर हे पुस्तक तुमच्या संग्रही हवेच.)

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा